अटलांटा
अमेरिका देशातील जॉर्जिया राज्याची राजधानी. / From Wikipedia, the free encyclopedia
अटलांटा (इंग्लिश: Atlanta) ही अमेरिका देशातील जॉर्जिया राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. २०१० साली ४.२ लाख लोकसंख्या असलेले अटलांटा अमेरिकेमधील ४०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अटलांटा-मॅरिएटा-सॅंडी स्प्रिंग्ज ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ५२.६९ लाख असून ह्या दृष्टीने ते अमेरिकेमधील नवव्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.
अटलांटा Atlanta |
|||
अमेरिकामधील शहर | |||
|
|||
गुणक: 33°45′18″N 84°23′24″W |
|||
देश | अमेरिका | ||
राज्य | जॉर्जिया | ||
स्थापना वर्ष | १८४७ | ||
क्षेत्रफळ | ३४३ चौ. किमी (१३२ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | कमाल १,०५० फूट (३२० मी) किमान ७३८ फूट (२२५ मी) |
||
लोकसंख्या | |||
- शहर | ४,२०,००३ | ||
- घनता | १,५५२ /चौ. किमी (४,०२० /चौ. मैल) | ||
- महानगर | ५२,६८,८६० | ||
http://www.atlantaga.gov |
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले अटलांटा अमेरिकन यादवी युद्धादरम्यान दक्षिणेकडील राज्यांचे एक प्रमुख वाहतूक व लष्करी केंद्र होते. आअज्च्या घडीला अटलांटा अमेरिकेमधील एक प्रमुख शहर आहे. २७० अब्ज डॉलर इतकी उलाढाल असलेल्या अटलांटाचा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिकेत सहावा तर जगात १५वा क्रमांक लागतो. कोका-कोला, डेल्टा एरलाइन्स, सीएनएन, यूपीएस इत्यादी जगातील अनेक प्रमुख कंपन्यांची मुख्यालये अटलांटा महानगरात स्थित आहेत. येथील हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा १९९८ सालापासून जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ राहिला आहे. २०१० साली पर्यटनासाठी अटलांटा अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे लोकप्रिय शहर होते.
१९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा अटलांटामध्ये भरवल्या गेल्या.