अशोकाचे शिलालेख
मगध साम्राज्याचा राज्यकर्ता राहिलेल्या सम्राट अशोक याचे शिलालेख. / From Wikipedia, the free encyclopedia
अशोकाचे शिलालेख म्हणजेच अशोकस्तंभ, मोठमोठे गोलाकार खडक आणि गुहांमधील (लेण्यामधील) भिंतीवर कोरलेल्या ३३ शिलालेखांचा संग्रह आहे. आणि मौर्य साम्राज्याचा सम्राट अशोक याने इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ या आपल्या राज्यकारभाराच्या काळात हे शिलालेख तयार करून घेतलेले आहेत.
सध्याच्या पाकिस्तान, नेपाळ आणि भारत या देशांमध्ये सगळीकडे हे शिलालेख विखुरलेले आहेत आणि बौद्ध धर्माचा हा पहिला स्पष्ट आणि निश्चित पुरावा आहे. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या सर्वात सामर्थ्यवान व बलाढ्य अशा सम्राट अशोकाच्या पुरस्कारामुळे आणि प्रयत्नांमुळे बौद्ध धर्माचा पहिल्यांदाच प्रचंड प्रसार कसा झाला त्याचे इत्थंभूत वर्णन या आज्ञापत्रांमध्ये केलेले आहे.