कटरा (जम्मू आणि काश्मीर)
From Wikipedia, the free encyclopedia
कटरा हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या रियासी जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे. कटरा जम्मू आणि काश्मीरच्या नैऋत्य भागात जम्मूच्या ४६ किमी उत्तरेस हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी जवळ वसले आहे. हिंदू धर्मामधील पवित्र वैष्णोदेवी मंदिर कटरापासून ४६ किमी अंतरावर आहे व तेथे जाण्यासाठी कटरामधून प्रवास करावा लागतो.
जलद तथ्य
कटरा | |
भारतामधील शहर | |
गुणक: 32°59′22″N 74°56′0″E |
|
देश | भारत |
राज्य | जम्मू आणि काश्मीर |
जिल्हा | रियासी |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,८७१ फूट (८७५ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ९,००८ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
बंद करा
कटरा हे काश्मीर रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. जुलै २०१४ पूर्वी दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व गाड्यांचे मार्ग जम्मू तावी रेल्वे स्थानकवर संपत असत. परंतु सध्या अनेक गाड्या कटरापर्यंत धावतात ज्यामुळे वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांना रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.