जस्टिन हेनिन
From Wikipedia, the free encyclopedia
जस्टिन हेनिन (फ्रेंच: Justine Henin; २००१-२००५ दरम्यानचे नावः जस्टिन हेनिन-हार्देन) ही बेल्जियम देशाची एक माजी टेनिसपटू आहे. हेनिनने आपल्या कारकिर्दीत सात ग्रॅंडस्लॅम व एकूण ४३ महिला एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले. हेनिन डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये एकूण ११७ आठवडे अव्वल क्रमांकावर होती.
देश | बेल्जियम |
---|---|
वास्तव्य | ब्रसेल्स |
जन्म |
१ जून, १९८२ (1982-06-01) (वय: ४१) लीज |
उंची |
१.६७ मी (५ फु ५ |
सुरुवात | १ जानेवारी १९९९ |
निवृत्ती | २६ जानेवारी २०११ |
शैली | उजवी |
बक्षिस मिळकत | $ २,०८,६३,३३५ |
प्रदर्शन | ५२५ - ११५ |
अजिंक्यपदे | ४३ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | क्र. १ (२० ऑक्टोबर २००३) |
ऑस्ट्रेलियन ओपन | विजयी (२००४) |
फ्रेंच ओपन | विजयी (२००३, २००५, २००६, २००७) |
विंबल्डन | अंतिम फेरी (२००१, २००७) |
यू.एस. ओपन | विजयी (२००३, २००७) |
प्रदर्शन | ४७ - ३५ |
अजिंक्यपदे | २ |
क्रमवारीमधील सर्वोच्च स्थान | क्र. १ |
शेवटचा बदल: सप्टेंबर २६, इ.स. २०११. |
पदक माहिती | |||
---|---|---|---|
बेल्जियम या देशासाठी खेळतांंना | |||
टेनिस | |||
ऑलिंपिक खेळ | |||
सुवर्ण | २००४ अथेन्स | महिला एकेरी |
आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहॅंड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत जॉन मॅकएन्रोने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिस खेळाडू ह्या शब्दांत बिली जीन किंग, आंद्रे अगासी व मार्टिना नवरातिलोव्हा ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.