येरेव्हान
From Wikipedia, the free encyclopedia
येरेव्हान (आर्मेनियन: Երևան) ही मध्य आशियामधील आर्मेनिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. अर्वाचीन काळापासून अस्तित्वात असलेले येरेव्हान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. हरझ्दान नदीच्या काठी वसलेले हे शहर इ.स. १९१८ पासून आर्मेनियाची राजधानी आहे. हे शहर आर्मेनियाच्या इतिहासातील तेरावे राजधानीचे शहर आहे.
येरेव्हान Երևան |
|||
आर्मेनिया देशाची राजधानी | |||
|
|||
गुणक: 40°11′N 44°31′E |
|||
देश | आर्मेनिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ७८२ | ||
क्षेत्रफळ | २२७ चौ. किमी (८८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,२४६ फूट (९८९ मी) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | ११,२१,९०० | ||
- घनता | ४,८९६ /चौ. किमी (१२,६८० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ४:०० | ||
http://www.yerevan.am |
पहिल्या महायुद्धानंतर आर्मेनियन शिरकाणामधून वाचलेले हजारो लोक येरेव्हानमध्ये स्थायिक झाले व स्वतंत्र आर्मेनिया देशाची राजधानी येरेव्हान येथे हलवण्यात आली. आर्मेनियाचे सोव्हिएत संघामध्ये विलीनीकरण करून आर्मेनियन सोसागची निर्मिती झाल्यानंतरच्या काळात येरेव्हानने झपाट्याने प्रगती केली.
२०११ साली येरेव्हानची लोकसंख्या ११ लाखांहून अधिक असून ते आर्मेनियाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. येथील ९८ टक्क्यांहून अधिक लोक आर्मेनियन वंशाचे आहेत.