रेड बुल अरेना
From Wikipedia, the free encyclopedia
रेड बुल अरेना (जर्मन: Red Bull Arena) हे जर्मनी देशाच्या लाइपझिश शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. भूतपूर्व पूर्व जर्मनी देशामधील हे सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम होते. इ.स. २०१० पर्यंत हे स्टेडियम झेंट्रालस्टेडियोन ह्या नावाने ओळखले जात असे. रेड बुल ह्या कंपनीने ह्या स्टेडियमचे हक्क विकत घेतल्यामुळे त्याचे नाव रेड बुल अरेना असे ठेवण्यात आले.
रेड बुल अरेना (जाल्त्सबुर्ग) याच्याशी गल्लत करू नका.
जलद तथ्य रेड बुल अरेना, मागील नावे ...
रेड बुल अरेना | |
---|---|
मागील नावे | झेंट्रालस्टेडियोन (१९५६ - २०१०) |
स्थान | लाइपझिश, जाक्सन जर्मनी |
उद्घाटन | ४ ऑगस्ट १९५६ |
पुनर्बांधणी | २००० – २००४ |
आसन क्षमता | ४४,३४५ |
बंद करा
२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील साखळी व बाद फेरीचे सामने येथे खेळवले गेले आहेत.