हिंदुकुश
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील पर्वतरांगा / From Wikipedia, the free encyclopedia
हिंदुकुश (फारसी: هِندوکُش ;), ही मध्य अफगाणिस्तान व उत्तर पाकिस्तान यांदरम्यान पसरलेली पर्वतरांग आहे. 'तिरिक मिर' हे ७,७०८ मीटर (२५,२८९ फूट) उंचीचे शिखर हिंदुकुश पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर होय. त्यालाच 'जगाचे छप्पर' अशीही संज्ञा वापरली जाते. हे शिखर पाकिस्तानातल्या खैबर-पख्तूनख्वा भागातील चित्रल परिसरात आहे.
ही पर्वतरांग म्हणजे पामिराची पर्वतरांग, काराकोरम रांग यांचा सर्वांत पश्चिमेकडील विस्तार होय. तसेच ही हिमालयाची उप-पर्वतरांग आहे. तसेच ही पर्वतरांग, जागतिक लोकसंख्येचा भौगोलिक मध्य समजली जाते.