हॉकी चॅम्पियन्स चषक
From Wikipedia, the free encyclopedia
हॉकी चँपियन्स चषक (Hockey Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेची सुरुवात १९७८ साली पाकिस्तानमध्ये झाली. ह्या सप्र्धेमध्ये १९८७ सालापासून महिला राष्ट्रीय संघ देखील समाविष्ट करण्यात आले. साखळी सामने पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या चँपियन्स चषक स्पर्धेत ८ पुरुष व ८ महिला संघ सहभाग घेतात. २०१४ पासून ही स्पर्धा दर दोन वर्षांनी एकदा खेळवण्याचे निश्चित करण्यात आले.
जलद तथ्य स्थापना, प्रदेश ...
स्थापना |
पुरुष: १९७८ महिला: १९८७ |
---|---|
प्रदेश | आंतरराष्ट्रीय (एफ.आय.एच.) |
संघांची संख्या | ८ |
सद्य विजेते |
पुरुष: जर्मनी (१०वे) महिला: आर्जेन्टिना (६वे) |
सर्वाधिक विजय |
पुरुष: ऑस्ट्रेलिया (१३) महिला: आर्जेन्टिना ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्स (६) |
बंद करा