१९३८ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९३८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तिसरी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये ४ जून ते १९ जून १९३८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. पर्ंतु निवड झाल्यानंतर ऑस्ट्रियाने माघार घेतल्यामुळे १५ संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळले.
जलद तथ्य Coupe du Monde 1938, स्पर्धा माहिती ...
Coupe du Monde 1938 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | फ्रान्स |
तारखा | ४ जून – १९ जून |
संघ संख्या | १५ |
स्थळ | १० (१० यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | इटली (२ वेळा) |
उपविजेता | हंगेरी |
तिसरे स्थान | ब्राझील |
चौथे स्थान | स्वीडन |
इतर माहिती | |
एकूण सामने | १८ |
एकूण गोल | ८४ (४.६७ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ४,८३,००० (२६,८३३ प्रति सामना) |
← १९३४ १९५० → | |
बंद करा
गतविजेत्या इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ४–२ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.