२००२ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
२००२ फिफा विश्वचषक, मे ३१ ते जून ३०, इ.स. २००२ दरम्यान दक्षिण कोरिया व जपान येथे आयोजित केला गेला होता. क्रमानुसार ही १७वी फिफा विश्वचषक स्पर्धा होती. मे १९९६मध्ये या दोन देशांना यजमानपद देण्याचे ठरले. अशाप्रकारे दोन देशांत ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची ही प्रथमच वेळ होती. दक्षिण अमेरिका, युरोप व उत्तर अमेरिकेबाहेर व आशियामध्ये ही स्पर्धा होण्याचीही ही प्रथमच वेळ होती.
जलद तथ्य 2002 FIFA 월드컵 한국/일본 2002 FIFAワールドカップ 韓国/日本, स्पर्धा माहिती ...
2002 FIFA 월드컵 한국/일본 2002 FIFAワールドカップ 韓国/日本 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश |
दक्षिण कोरिया जपान |
तारखा | ३१ मे – ३० जून |
संघ संख्या | ३२ |
स्थळ | २० (२० यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | ब्राझील (५ वेळा) |
उपविजेता | जर्मनी |
तिसरे स्थान | तुर्कस्तान |
चौथे स्थान | दक्षिण कोरिया |
इतर माहिती | |
एकूण सामने | ६४ |
एकूण गोल | १६१ (२.५२ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | २७,०५,१९७ (४२,२६९ प्रति सामना) |
सर्वाधिक गोल | रोनाल्डो |
सर्वोत्तम खेळाडू | ओलिफर कान |
← १९९८ २००६ → | |
बंद करा
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने जर्मनीला २-० असे हरवून पाचव्यांदा विश्वचषक जिंकला.