२००६ फिफा विश्वचषक बाद फेरी
From Wikipedia, the free encyclopedia
२००६ फिफा विश्वचषक नॉक आउट फेरी २००६ फिफा विश्वचषकाचा दुसरा भाग होता. आठ गटातील दोन सर्वोत्तम संघांना या फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीत एकदा हरल्यास संघांना बाहेर पडावे लागले. उपांत्य फेरीत हरणारे संघ तिसऱ्या क्रमांकासाठी एक सामना खेळले.
नोंद: सामने सुरू होण्याची वेळ स्थानिक (जर्मन प्रमाणवेळ) आहे. उन्हाळ्यात ही वेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळेच्या दोन तास पुढे असते.