आलिया भट्ट
हिंदी चित्रपट अभिनेत्री / From Wikipedia, the free encyclopedia
आलिया भट्ट (जन्म:१५ मार्च, १९९३) ही एक भारतीय वंशाची, ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेली हिदी चित्रपट अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने टू स्टेट, शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर ॲंन्ड सन्स, ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
जलद तथ्य आलिया भट्ट, जन्म ...
आलिया भट्ट | |
---|---|
जन्म |
आलिया महेश भट्ट १५ मार्च, १९९३ (1993-03-15) (वय: ३१) मुंबई |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, मॉडेल |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २०१२ - चालू |
भाषा | हिंदी |
पुरस्कार | फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार |
वडील | महेश भट्ट |
आई | सोनी राजदान |
पती | |
नातेवाईक | पूजा भट्ट (सावत्र बहीण) |
बंद करा