इराक
From Wikipedia, the free encyclopedia
इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
इराक جمهورية العراق Republic of Iraq इराकचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: मौतिनी | |||||
इराकचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
बगदाद | ||||
अधिकृत भाषा | अरबी, कुर्दिस्ताननी | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ३ ऑक्टोबर १९३२ | ||||
- प्रजासत्ताक दिन | १४ जुलै १९५८ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ४,३८,३१७ किमी२ (५८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.१ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ३,१२,३४,००० (३९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ७१.२/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ११४.१५१ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
राष्ट्रीय चलन | इराकी दिनार | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी + ३:०० | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | IQ | ||||
आंतरजाल प्रत्यय | .iq | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ९६४ | ||||
१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन सद्दाम हुसेन ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली अमेरिकेने इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. नूरी अल-मलिकी हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.
इराकचे क्षेत्रफळ ४,३८,३१७ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या ३,१४,३७,००० एवढी आहे. अरबी व कुर्दिश ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तैग्रिस नदी आणि युफ्रेटिस नदी या दोन नद्यांमधील प्रदेश म्हणून पूर्वी या देशाला 'मेसोपोटेमिया' असे म्हणत.
इराकचे अधिकृत चलन दिनार असून या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे. बार्ली हे इराकचे प्रमुख धान्य आहे. खजुराची निर्यात करण्यात इराकचा जगात पहिला क्रमांक लागतो.