छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[1][2] यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.
जलद तथ्य छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, माहिती ...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: BOM – आप्रविको: व्हीएपीओ
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | GVK, भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
प्रचालक | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित(MIAL) | ||
कोण्या शहरास सेवा | मुंबई | ||
स्थळ | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
हब |
| ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३७ फू / ११ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 19°05′19″N 072°52′05″E | ||
संकेतस्थळ | www.csia.in | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
१४/३२ | २,९२५ | ९,५९६ | डांबरी धावपट्टी |
०९/२७ | ३,४४५ | ११,३०२ | डांबरी धावपट्टी |
सांख्यिकी (२००८-२००९) | |||
प्रवासी | २ ते ४ कोटी | ||
कार्गो हाताळणी | ५३०,२७८ टन | ||
बंद करा
या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे.