कालिया
From Wikipedia, the free encyclopedia
हिंदू पुराणांनुसार कालिया हा वृंदावनामध्ये यमुना नदीत राहणारा एक विषारी नाग होता. याच्या विषारी फुत्कारांमुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते. एकमेव कदंब वृक्ष सोडता या ठिकाणी कुणीही मासे, पशू, पक्षी जिवंत राहत नसत. भागवत पुराणानुसार कृष्णाने याचे दमन करून याला यमुनेतून पळवून लावले.
हा लेख कालिया नावाचा हिंदू पुराणांतील नाग याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कालिया (निःसंदिग्धीकरण).