कुरितिबा
From Wikipedia, the free encyclopedia
कुरितिबा (पोर्तुगीज: Curitiba) ही ब्राझील देशाच्या पाराना राज्याची राजधानी व देशातील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर शहर आहे. सुमारे १७.५ लाख शहरी व ३२ लाख महानगरी लोकसंख्या असलेले कुरितिबा हे दक्षिण ब्राझीलमधील सर्वात मोठे आर्थिक केंद्र व ब्रझिलमधील महत्त्वाचे सांस्कृतिक व राजकीय स्थान आहे.
जलद तथ्य
कुरितिबा Curitiba |
|||
ब्राझीलमधील शहर | |||
|
|||
कुरितिबाचे पारानामधील स्थान | |||
गुणक: 25°25′47″S 49°16′19″W |
|||
देश | ब्राझील | ||
राज्य | पाराना | ||
स्थापना वर्ष | २९ मार्च १६९३ | ||
क्षेत्रफळ | ४३४.९७ चौ. किमी (१६७.९४ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३,०६६ फूट (९३५ मी) | ||
लोकसंख्या (२००९) | |||
- शहर | १७,४६,८९६ | ||
- घनता | ४,०१६.२ /चौ. किमी (१०,४०२ /चौ. मैल) | ||
- महानगर | ३१,६८,९८० | ||
www.curitiba.pr.gov.br |
बंद करा
१९व्या शतकाच्या मध्यापासून वेगाने वाढत असलेल्या कुरितिबाला रीडर्स डायजेस्ट ह्या मासिकाने ब्राझिलमधील राहण्यासाठी सर्वोत्तम शहर असे गौरविले आहे. कुरितिबा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना दा बायशादा ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील.