क्रिकेट विश्वचषक, २०१९ - संघ
From Wikipedia, the free encyclopedia
क्रिकेट विश्वचषक, २०१९ साठी निवडल्या गेलेल्या संघांची ही यादी आहे.[2] सर्व १० संघांनी त्यांच्या १५ खेळाडूंची नावे २३ एप्रिल पर्यंत सादर करणे गरजेचे होते,[3] तर संघांतील बदल २२ मे पर्यंत करण्यास परवानगी आहे. [4] ३ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर करून सर्वप्रथम विश्वचषक संघ जाहीर करण्याचा मान न्यू झीलंडने मिळवला.[5] वेस्ट इंडीजने सर्वात शेवटी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेल्या अंतिम मुदतीच्या एक दिवसानंतर, २४ एप्रिल २०१९ रोजी संघ जाहीर केला.[6]
न्यू झीलंडचा टॉम ब्लंडेल आणि बांग्लादेशचा अबू जायेद हे दोन क्रिकेट खेळाडू, त्यांची नावे विश्वचषक संघात निवडली जाण्याआधी एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळले नव्हते.[7][8] १३ मे २०१९ रोजी, जाएदने बांग्लादेशतर्फे वेस्ट इंडीज विरुद्ध आयर्लंड मधील तिरंगी मालिकेच्या पाचव्या सामन्यात पदार्पण केले. [9] इंग्लंडचा आयॉन मॉर्गन, वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर आणि बांगलादेशचा मशरफे मोर्तझा, ह्या तीन कर्णधारांनी आधीच्या स्पर्धेत स्वतःच्या संघांचे नेतृत्व केले होते.[10]