जगातील सात नवी आश्चर्ये
From Wikipedia, the free encyclopedia
जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली.[1] ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.
जगातील सात आश्चर्ये याच्याशी गल्लत करू नका.