जॉन वेन विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
जॉन वेन विमानतळ (आहसंवि: SNA, आप्रविको: KSNA, एफ.ए.ए. स्थळसूचक: SNA) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ऑरेंज काउंटीमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. लॉस एंजेलसपासून जवळ असलेला हा विमानतळ सांता ॲना शहरात आहे. १९७९पूर्वी या विमानतळास ऑरेंज काउंटी विमानतळ असे नाव होते.
जलद तथ्य जॉन वेन विमानतळ <--, माहिती ...
जॉन वेन विमानतळ <-- | |||
---|---|---|---|
[[Image:John Wayne Airport Logo.svg-->|75px]] | |||
आहसंवि: SNA – आप्रविको: KSNA – एफएए स्थळसंकेत: SNA | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया | ||
प्रचालक | ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया | ||
कोण्या शहरास सेवा | ऑरेंज काउंटी, कॅलिफोर्निया | ||
स्थळ | १८६०१, एरपोर्ट वे सांता आना, कॅलिफोर्निया | ||
गुणक (भौगोलिक) | 33°40′32″N 117°52′06″W | ||
बंद करा
हा तळ ऑरेंज काउंटी, लॉस एंजेलस महानगराचा दक्षिण भाग, सांता ॲना, कोस्ता मेसा, न्यूपोर्ट बीच, अर्व्हाइन सह अनेक शहरांना विमानसेवा पुरवतो. २०१५ च्या सुमारास साउथवेस्ट एरलाइन्स, अमेरिकन एरलाइन्स, युनायटेड एरलाइन्स आणि अलास्का एरलाइन्स येथील प्रमुख विमानवाहतूक कंपन्या होत्या.[1]