मँचेस्टर सिटी एफ.सी.
From Wikipedia, the free encyclopedia
मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मॅंचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
जलद तथ्य पूर्ण नाव, टोपणनाव ...
मॅंचेस्टर सिटी एफ.सी. | ||||
पूर्ण नाव | मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | The Citizens, The Blues, City | |||
स्थापना | इ.स. १८८० | |||
मैदान | एतिहाद स्टेडियम, मॅंचेस्टर, इंग्लंड (आसनक्षमता: ४७,७२६) | |||
लीग | प्रीमियर लीग | |||
२०११-१२ | प्रिमियर लीग, १ला | |||
|
बंद करा
१९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मॅंचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मॅंचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मॅंचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चॅंपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मॅंचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला.