व्हेनेसा पॅरॅडिस
From Wikipedia, the free encyclopedia
व्हेनेसा शांटाल पॅरॅडिस (२२ डिसेंबर, १९७२:से-मॉर-दे-फॉसे, व्हाल-दे-मार्न, फ्रांस - ) [1] [2] एक फ्रेंच गायिका, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पॅरॅडिस १९८७मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या ज्यो ले टॅक्सी (१९८७) या गाण्याला अभूतपूर्व यश मिळाल्याने प्रसिद्ध झाली. [3] वयाच्या १८व्या वर्षी तिला प्रि रोमी श्नाइडर [4] आणि सर्वाधिक नवीन अभिनेत्री [5] [6] [7] [8] [9] गायिका आणि अभिनेत्री म्हणून फ्रांसचे सर्वोच्च सन्मान मिळाले. [10] [11] [12] तिच्या सर्वात उल्लेखनीय चित्रपटांमध्ये जरार्ड डेपार्ड्यू सोबतचा एलिसा (१९९५), [13] ज्याँ रेनो बरोबरचा विच वे लव्ह (१९९७)[14] ज्याँ-पॉल बेलमोंडो आणि अलैन देलाँ बरोबरचा अन चान्स सुर ड्यूक्स (१९९८) [15] १५] यांचा समावेश आहे. [16] १९९५च्या कान चित्रपट महोत्सवात तिने ज्याँ मॉरोला दिलेली श्रद्धांजली फ्रांसमध्ये प्रसिद्ध झाली. या दरम्यान तिने ले तूर्बियाँ हे गाणे गायले. [17] [18] [19] [20] २०२२ मध्ये तिला ममन या नाटकातील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मोलिए पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. [21]
व्हेनेसा पॅरेडिस | |
---|---|
२०१६मध्ये पॅरॅडिस | |
जन्म |
व्हेनेसा शांटाल पॅरेडिस २२ डिसेंबर, १९७२ (1972-12-22) (वय: ५१) से-मॉर-दे-फॉसे, व्हाल-दे-मार्न, फ्रांस |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
वांशिकत्व | फ्रेंच |
नागरिकत्व | फ्रेंच |
पेशा | गायक, अभिनेत्री, मॉडेल |
कारकिर्दीचा काळ | १९८७- |
जोडीदार |
सॅम्युएल बेंचेत्रि (ल. २०१८ - ) जॉनी डेप (१९९८-२०१२) |
अपत्ये | लिली-रोझ डेप, जॅक डेप |
वडील | आंद्रे पॅरॅडिस |
आई | कॉरिन पॅरॅडिस |
नातेवाईक | अॅलिसन पॅरॅडिस (बहीण) |
Musical career | |
शैली | |
रिकॉर्ड लेबल |
|
संबंधित प्रदर्शन |
|
पॅरॅडिसने अनेक आणि गीतकारांशी जवळचे संबंध ठेवून त्यांच्या बरोबर संगीतसंच तयार केले. यात एटियें रोडा-गिल (१९८८), सर्ज गेन्सबर्ग (१९९०), लेनी क्रॅवित्झ (१९९२), मॅथ्यू चेडिड (२००७) आणि बेंजामिन बायोले, सॅम्युएल बेंचेत्रि (२०१३) यांचा समावेश आहे.[22] [23] पॅराडिस जगभरातील ३००पेक्षा अधिक मासिकांच्या मुखपृष्ठांवर दिसली आहे. यांत व्होग, एल, हार्पर बझार, मदाम फिगारो, व्हॅनिटी फेर, ग्लॅमर, प्रीमियेर आणि मेरी क्लेर यांचा समावेश आहे. [24]
पॅरॅडिसला २०११मध्ये ऑर्डर दे आर्ट्स ए दे लेटर्स ची अधिकारपद दिले गेले [25] तसेच २०१५ मध्ये ऑर्डर दे ला नॅशनल दे ला लेजाँ द'ऑनोर मध्ये शेव्हालिये (सरदार) पद दिले गेले. [26]