सांता क्रुझ काउंटी (ॲरिझोना)
From Wikipedia, the free encyclopedia
सांता क्रुझ काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नोगालेस येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील सांता क्रुझ काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांता क्रुझ काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,६६९ इतकी होती.[2]
सांता क्रुझ काउंटी तुसॉन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १५ मार्च, १८९९ रोजी झाली. या काउंटीत उगम पावणाऱ्या सांता क्रुझ नदीचे नाव यास दिलेले आहे.