२०१० फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले.
जलद तथ्य स्पर्धा माहिती, यजमान देश ...
स्पर्धा माहिती | |
---|---|
यजमान देश | दक्षिण आफ्रिका |
तारखा | जून ११ – जुलै ११ |
संघ संख्या | ३२ (६ परिसंघांपासुन) |
स्थळ | १० (९ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | स्पेन (1 वेळा) |
उपविजेता | नेदरलँड्स |
तिसरे स्थान | जर्मनी |
चौथे स्थान | उरुग्वे |
इतर माहिती | |
एकूण सामने | ६४ |
एकूण गोल | १४५ (२.२७ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | ३१,७८,८५६ (४९,६७० प्रति सामना) |
सर्वाधिक गोल |
थॉमस मुलर डेव्हिड व्हिया वेस्ली स्नायडर दिएगो फोर्लन (५ गोल)[1] |
सर्वोत्तम खेळाडू | दिएगो फोर्लन |
← २००६ २०१४ → | |
बंद करा