इस्लाम
From Wikipedia, the free encyclopedia
इस्लाम हा एक आदम प्रथम पुरूषआहे असे मानणारा धर्म असून अल्लाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. हा धर्म साधारण पणे 1400 वर्षांपासून अस्तित्वात आला. त्याचे अंतिम संदेश आणणारे दुत हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इ.स. ६१० मध्ये अरब़च्या मक्का या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.
प्रेषित मोहम्मद (इश्वर त्यांच्या वर कृपा करो ) अंतिम पैगम्बर असुन त्यांना पवित्र कुरआन हा देवाचा संदेश मिळाला आहे. त्यांच्या नंतर दिव्य कुरआन मुसलमानांसाठी जिहाद करून मोक्ष प्राप्ति चा एकमेव मार्ग आहे. मुस्लिमांच्या मते इस्लाम एकमेव असा धर्म आहे जो देवाच्या एकमेवतेला मानतो आणि आणि मानवजातीला ऐक्य शिकवतो, असा मुसलमानांचा विश्वास आहे. आणि त्याच वेळी इतर दृष्टिकोनातून सहिष्णू आहे, याचे चांगले उदाहरण म्हणजे जगातील अतिशय शांततेत व सहिष्णू पणे जगत असणारे जगातील 57 ते 60 मुस्लिम देश हे होय. कारण जिहाद हे इस्लामचे शिक्षण आहे. खरे तर, तो अल्लाहने मागील 1400 वर्षांपासून संदेष्ट्यांना व धर्मांना पाठविला, तो ईश्वराच्या एकमेवतेचा संदेश आणि सर्व वंशांच्या बंधुत्वाचा मूळ संदेश आहे. इस्लाम अल्लाच्या एकमेवतेच्या आणि सर्व मानवजातीच्या बंधुत्वाच्या या शिकवणीची देखभाल करतो. मुसलमान त्यांच्या धर्मा ला इस्लाम म्हणतात. (अरबी शब्द इस्लामचा अर्थ अल्लाहच्या अधीन राहून शांती मिळवणे होय.) मुसलमान हा शब्द इस्लामच्या नावावरून बनलेले एक विशेषण आहे आणि ज्याचा अर्थ इस्लाम धर्म पाळणारा माणूस.