कुस्को
From Wikipedia, the free encyclopedia
कुस्को (स्पॅनिश: Cuzco; क्वेचुआ: Qusqu किंवा Qosqo) हे पेरू देशातील एक शहर आहे. हे शहर पेरूच्या दक्षिण भागात आन्देस पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर वसले असून ह्याच नावाच्या प्रदेशाचे राजधानीचे शहर आहे. १८व्या शतकाच्या अखेरीस दक्षिण अमेरिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या कुस्कोची लोकसंख्या २००७ साली सुमारे ३.५९ लाख इतकी होती.
जलद तथ्य
कुस्को Cusco |
||
पेरूमधील शहर | ||
|
||
गुणक: 13°31′30″S 71°58′20″W |
||
देश | पेरू | |
प्रदेश | कुस्को | |
क्षेत्रफळ | ७०,०१५ चौ. किमी (२७,०३३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ११,१५२ फूट (३,३९९ मी) | |
लोकसंख्या (२००७) | ||
- शहर | ३,५८,९३५ | |
www.municusco.gob.pe |
बंद करा
ऐतिहासिक इंका साम्राज्याची राजधानी असलेले कुस्को आजच्या घडिला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व एक मोठे पर्यटनकेंद्र आहे. राष्ट्रीय संविधानात पेरूची ऐतिहासिक राजधानी असा उल्लेख केलेल्या कुस्को येथे दरवर्षी अंदाजे २० लाख पर्यटक भेट देतात.