कोपान प्रांत
From Wikipedia, the free encyclopedia
कोपान प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या वायव्य भागात असलेल्या या प्रांतात उत्तम प्रतीची तंबाखू आणि सिगार निर्माण होतात.
हा लेख होन्डुरासचा प्रांत कोपान याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोपान (निःसंदिग्धीकरण).
याची राजधानी सांता रोसा दे कोपान येथे आहे. २०१५ च्या अंदाजानुसार या प्रांताची लोकसंख्या ३,८२,७२२ होती.
या प्रांतातील कोपान नावाच्या गावात झालेल्या उत्खननात प्राचीन माया संस्कृतीची मोठी नगरी आढळून आली आहे.