पिट्सबर्ग
From Wikipedia, the free encyclopedia
पिट्स्बर्ग (इंग्लिश: Pittsburgh) हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या नैऋत्य भागात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ओहायो नदीची सुरुवात ह्या संगमामधूनच होते. पिट्स्बर्ग शहराची लोकसंख्या ३ लाख तर अमेरिकेमधील २२व्या मोठ्या पिट्स्बर्ग महानगराची लोकसंख्या २३.५ लाख इतकी आहे.
जलद तथ्य
पिट्स्बर्ग Pittsburgh |
|||
अमेरिकामधील शहर | |||
|
|||
गुणक: 40°26′30″N 80°0′0″W |
|||
देश | अमेरिका | ||
राज्य | पेन्सिल्व्हेनिया | ||
स्थापना वर्ष | सप्टेंबर १४, इ.स. १७५८ | ||
क्षेत्रफळ | १५१ चौ. किमी (५८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ३,०५,७०४ | ||
- घनता | २,१७६ /चौ. किमी (५,६४० /चौ. मैल) | ||
- महानगर | २३,५६,२८५ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | ||
city.pittsburgh.pa.us |
बंद करा
अमेरिकेतील स्टील उत्पादन उद्योगाचे मोठे केंद्र असलेल्या पिट्स्बर्गमध्ये एकूण ४४६ पूल आहेत ज्यांमुळे त्याची टोपणनावे "The City of Bridges" व "The Steel City" ही पडली आहेत.
अनेक अहवालांनुसार पिट्स्बर्ग हे अमेरिकेमधील सर्वात निवासयोग्य शहर मानले गेले आहे.