राजस्थान
भारतातील एक राज्य. / From Wikipedia, the free encyclopedia
राजस्थान (जुने नाव राजपुताना) हे पश्चिम भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदी व राजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे.
?राजस्थान भारत | |
— राज्य — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ३,४२,२३६ चौ. किमी |
राजधानी | जयपुर |
मोठे शहर | जयपुर |
जिल्हे | ३३ |
लोकसंख्या • घनता |
६,८६,२१,०१२ (८वी) (२००१) • २०१/किमी२ |
भाषा | हिंदी, राजस्थानी गुजराती |
राज्यपाल | कलराज मिश्रा |
मुख्यमंत्री | भजन लाल शर्मा |
उपमुख्यमंत्री | दीया कुमारी, प्रेमचंद बैरवा |
स्थापित | १ नोव्हेंबर, १९६० |
विधानसभा (जागा) | राजस्थान विधानसभा (२००) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-RJ |
संकेतस्थळ: राजस्थान सरकारचे संकेतस्थळ | |
राजस्थान चिन्ह |
उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू ही येथील प्रमुख धान्य पिके, तर ऊस, तेल व तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनास, लुनी, घग्गर व चंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड व मेवाड असे दोन विभाग आहेत.