रायगड लोकसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. / From Wikipedia, the free encyclopedia
रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.