लाहोर
From Wikipedia, the free encyclopedia
लाहोर (पंजाबी: ਲਹੌਰ; उर्दू: لاہور) ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी व देशामधील कराचीच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाहोर पाकिस्तानच्या पूर्व भागात रावी नदीच्या काठावर वसले असून ते भारत-पाकिस्तानच्या वाघा सीमेपासून २२ किमी तर अमृतसरपासून केवळ ४२ किमी अंतरावर स्थित आहे. दक्षिण आशियामधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले लाहोर हे पंजाबी लोक स्थानिक असलेले जगातील सर्वात मोठे शहर आहे. पंजाब प्रदेशाची सांस्कृतिक राजधानी मानले जात असलेले लाहोर आर्थिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या पाकिस्तानमधील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे.
लाहोर لاہور |
|
पाकिस्तानमधील शहर | |
गुणक: 31°32′59″N 74°20′37″E |
|
देश | पाकिस्तान |
प्रांत | पंजाब |
क्षेत्रफळ | १,७७२ चौ. किमी (६८४ चौ. मैल) |
लोकसंख्या (२००९) | |
- शहर | ९६ लाख |
- महानगर | १.२५ कोटी |
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० |
लाहोर १६व्या शतकामध्ये मोगल साम्राज्याचे, इ.स. १८०२ ते १८४९ दरम्यान शीख साम्राज्याचे तर ब्रिटीश राजवटीमध्ये पंजाब प्रांताची राजधानी होती. येथील बादशाही मशीद, लाहोर किल्ला, शालिमार बागा इत्यादी स्थाने जगप्रसिद्ध आहेत.