१९८६ फिफा विश्वचषक
From Wikipedia, the free encyclopedia
१९८६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती स्पेन देशामध्ये ३१ मे ते २९ जून १९८६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
जलद तथ्य Copa del Mundo de Fútbol – España 82, स्पर्धा माहिती ...
Copa del Mundo de Fútbol – España 82 | |
---|---|
स्पर्धा माहिती | |
यजमान देश | मेक्सिको |
तारखा | ३१ मे – २९ जून |
संघ संख्या | २४ |
स्थळ | १२ (९ यजमान शहरात) |
अंतिम निकाल | |
विजेता | आर्जेन्टिना (२ वेळा) |
उपविजेता | पश्चिम जर्मनी |
तिसरे स्थान | फ्रान्स |
चौथे स्थान | बेल्जियम |
इतर माहिती | |
एकूण सामने | ५२ |
एकूण गोल | १३२ (२.५४ प्रति सामना) |
प्रेक्षक संख्या | २३,९३,०३१ (४६,०२० प्रति सामना) |
सर्वाधिक गोल | गॅरी लिनेकर |
सर्वोत्तम खेळाडू | दिएगो मारादोना |
← १९८२ १९९० → | |
बंद करा
आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले. ह्या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीमधील आर्जेन्टिना विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्यातील दिएगो मारादोनाने मारलेले दोन गोल स्मरणीय ठरले. पहिला गोल मारादोनाने हाताने चेंडू ढकलून केला ज्याला हँड ऑफ गॉड असे संबोधले जाते तर दुसरा गोल त्याने एकट्याने चार इंग्लिश बचावपटूंना चकवून केला ज्याला गोल ऑफ द सेंच्युरी (शतकामधील सर्वोत्तम गोल) असे ओळखले जाते.