स्पेन
दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश / From Wikipedia, the free encyclopedia
स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे.[टीप 5] स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे. माद्रिद ही स्पेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
स्पेन Reino de España (रेइनो दे एस्पान्या) स्पेनचे राजतंत्र | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Plus Ultra(लॅटिन) अजुनी पुढे | |||||
राष्ट्रगीत: मार्चा रेआल (शाही कूच) (फक्त संगीत, शब्द नाहीत)[टीप 1] | |||||
स्पेनचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
माद्रिद | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश (कास्तेयानो))[टीप 2] | ||||
इतर प्रमुख भाषा | गॅलिशियन, बास्क, कातालान | ||||
- राष्ट्रप्रमुख | फेलिपे सहावा (राजा) | ||||
- पंतप्रधान | पेद्रो सांचेझ | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
युरोपीय संघात प्रवेश | १ जानेवारी १९८६ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ५,०४,७८२ किमी२ (५०वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.०४ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | ४,५२,००,७३७ (२००७चा अंदाज)[1] (२९वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८७.८/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १,३५१ अब्ज[2] अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २६, ३२० अमेरिकन डॉलर (२५वा क्रमांक) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो (१९९९ पासून) स्पॅनिश पेसेटा (१९९९ पर्यंत) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ[टीप 3] (यूटीसी + १:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | ES | ||||
आंतरजाल प्रत्यय | .es, .cat, .eu[टीप 4] | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३४ | ||||
स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासुन सभासद आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.