२०१२ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१२ उन्हाळी ऑलिंपिक (इंग्लिश: Games of the XXX Olympiad) ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची ३०वी आवृत्ती युनायटेड किंग्डम देशामधील लंडन शहरात जुलै २७ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात येईल. ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद तिसऱ्यांदा भुषवण्याचा मान मिळणारे लंडन हे जगातील पहिलेच शहर आहे. ह्यापूर्वी १९०८ व १९४८ सालांमधील स्पर्धा लंडनमध्ये खेळवण्यात आल्या होत्या.
२०१२ उन्हाळी ऑलिंपिक XXX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | लंडन युनायटेड किंग्डम
|
सहभागी देश | २०५ (अंदाजे) |
सहभागी खेळाडू | १८,५०० (अंदाजे) |
स्पर्धा | ३०२, २६ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | जुलै २७
|
सांगता | ऑगस्ट १२ |
मैदान | ऑलिंपिक मैदान
|
◄◄ २००८ २०१६ ►► |
६ जुलै २००५ रोजी सिंगापूरात झालेल्या आय.ओ.सी.च्या ११७व्या अधिवेशनात लंडनने पॅरिस, माद्रिद, मॉस्को व न्यू यॉर्क शहर ह्या इतर यजमानोत्सुक शहरांपेक्षा अधिक गूण मिळवत यजमानपदाची बाजी मारली. ह्या स्पर्धेसाठी ग्रेटर लंडनच्या पूर्व भागातील न्यूहॅम ह्या बरोमधील स्ट्रॅटफर्ड भागातील जुना व बंद पडलेला औद्योगिक प्रदेश विकसित करून तेथे २० हेक्टर क्षेत्रफळाचे ऑलिंपिक पार्क बांधण्यात आले. तसेच लंडन महानगर परिसर व युनायटेड किंग्डममधील अनेक चालू क्रीडा स्थळे ह्या स्पर्धेदरम्यान वापरली गेली.