सिंगापूर
From Wikipedia, the free encyclopedia
सिंगापूर हे आग्नेय आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले द्वीपराष्ट्र आहे. विषुववृत्तापासून १३७ कि.मी. (८५ मैल) उत्तरेस असलेल्या या देशाच्या उत्तरेस मलेशियाचा जोहोर प्रांत व दक्षिणेस इंडोनेशियाची रिआउ बेटे आहेत. अवघे ७०४.० कि.मी.२ (२७२ वर्ग मैल) क्षेत्रफळ असलेले सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे.
सिंगापूर बेटावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८१९ साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील सिंगापूर नदीच्या मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती. ओरांग लाउट जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर मसाला मार्गावरील महत्त्वाचे केंद्र ठरू लागले; ब्रिटिश साम्राज्यातील सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले. आशियाई देशांच्या दृष्टीने सिंगापूर या शहराला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
सिंगापूर | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "Majulah Singapura" (मलाय) "निरंतर पुढे, सिंगापूर" | |||||
राष्ट्रगीत: मजुला सिंगापूरा | |||||
सिंगापूरचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | सिंगापूर शहर | ||||
अधिकृत भाषा | इंग्लिश[1][2] मलाय चिनी तमिळ | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्त्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | हलीमा याकूब | ||||
- पंतप्रधान | ली श्येन लूंग | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्थापना | २९ जानेवारी १८१९[3] | ||||
- युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य | ३१ ऑगस्ट १९६३ | ||||
- स्वातंत्र्य दिवस | ऑगस्ट ९, १९६५ (मलेशियापासून विलग) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ७१०.२ किमी२ (१८७वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.४४४ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१६ | ५६,०७,३०० (११५वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ७,७९७/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | २३९.९६६ अब्ज[4] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ५०,५२३ अमेरिकन डॉलर (४थावा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.९४४[5] (अति उच्च) (२३ वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | सिंगापूर डॉलर (SGD) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | सिंगापूर प्रमाणवेळ (यूटीसी+८) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | SG | ||||
आंतरजाल प्रत्यय | .sg | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ६५ | ||||