एरोमेक्सिको
From Wikipedia, the free encyclopedia
एरोमेक्सिको ही मेक्सिकोमधील प्रमुख विमानकंपनी आहे. याची धारक कंपनी एरोव्हियास दे मेक्सिको, एस.ए. दे सी.व्ही आहे.[1] मेक्सिको सिटीमध्ये मुख्यालय असलेली ही विमानकंपनी मेक्सिको, अमेरिका, कॅरिबियन, युरोप आणि आशियातील ५६ गंतव्यस्थानांना विमानसेवा पुरवते.[2] एरोमेक्सिकोचा मुख्य तळ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून दुय्यम तळ मॉंतेरे आंतरराष्ट्रीय विमानतळ, ग्वादालाहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हेर्मोसियो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत.
एरोमेक्सिकोच्या विमानांच्या शेपटीवर क्वाह्ट्लीचे (गरुड योद्धा) चित्र असते.