फ्रांकफुर्ट विमानतळ
From Wikipedia, the free encyclopedia
फ्रांकफुर्ट आम माइन आंतरराष्ट्रीय विमानतळ (जर्मन: Flughafen Frankfurt am Main) (आहसंवि: FRA, आप्रविको: EDDF) हा जर्मनी देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ हेसेन राज्यामधील फ्रांकफुर्ट शहरामध्ये स्थित आहे. ८ जुलै १९३६ रोजी बांधून पूर्ण झालेला व २०१२ साली सुमारे ५.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा फ्रांकफुर्ट हा लंडन हीथ्रो व पॅरिस चार्ल्स दि गॉलखालोखाल युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या तर जगात दहाव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
जलद तथ्य फ्रांकफुर्ट विमानतळ फ्लुगहाफेन फ्रांकफुर्ट आम माइन, आहसंवि: FRA – आप्रविको: EDDF ...
फ्रांकफुर्ट विमानतळ फ्लुगहाफेन फ्रांकफुर्ट आम माइन | |||
---|---|---|---|
फ्रांकफुर्ट विमानतळ | |||
आहसंवि: FRA – आप्रविको: EDDF | |||
माहिती | |||
मालक/प्रचालक | फ्रापोर्ट | ||
कोण्या शहरास सेवा | फ्रांकफुर्ट | ||
हब | लुफ्तांसा, कॉन्डोर फ्लुगडियेन्स्ट | ||
समुद्रसपाटीपासून उंची | १११ मी / ३६४ फू | ||
संकेतस्थळ | www.frankfurt-airport.com | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
07L/25R | ४,००० | १३,१२३ | डांबरी |
07R/25L | ४,००० | १३,१२३ | डांबरी |
18A | ४,००० | १३,१२३ | कॉंक्रीट |
बंद करा