१९०६ उन्हाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
१९०६ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील एक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये २२ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा आय.ओ.सी.च्या चार वर्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्या वेळी जरी ही ऑलिंपिक स्पर्धा मानली गेली असली तरी सध्या येथे मिळालेल्या पदकांना आय.ओ.सी.च्या लेखी वैध दर्जा नाही व ही पदके आय.ओ.सी.च्या लोझानमधील संग्रहालयात ठेवली गेलेली नाहीत.
अधिक माहिती १९०६ उन्हाळी ऑलिंपिक १९०६ अवेळी स्पर्धा, समारंभ ...
१९०६ उन्हाळी ऑलिंपिक १९०६ अवेळी स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | अथेन्स ग्रीस
|
सहभागी देश | २० |
सहभागी खेळाडू | ९०३ |
स्पर्धा | ७८, १३ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | एप्रिल २२
|
सांगता | मे २ |
अधिकृत उद्घाटक | राजा जॉर्ज पहिला |
मैदान | पंथिनैको स्टेडियम
|
◄◄ १९०४ १९०८ ►► |
बंद करा