ओहायो नदी
From Wikipedia, the free encyclopedia
ओहायो नदी (इंग्लिश: Ohio River) ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी व अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या पूर्व भागामधील एक प्रमुख नदी आहे. पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमातून ओहायो नदीची सुरुवात होते. तेथून नैऋत्य दिशेला १,५७९ किमी लांब वाहत जाउन ओहायो नदी इलिनॉय व मिसूरी राज्यांच्या सीमेवरील कैरो ह्या शहराजवळ मिसिसिपी नदीला मिळते.
ओहायो नदीचे पाणलोट क्षेत्र ४,९०,६०० चौरस किमी पसरले असून ह्या क्षेत्रामध्ये १४ राज्यांचा समावेश होतो. ओहायो, इंडियाना व इलिनॉय ह्या राज्यांच्या दक्षिण सीमा तसेच वेस्ट व्हर्जिनिया व केंटकी राज्यांच्या उत्तर सीमा ओहायो नदीने आखल्या आहेत.