बुलढाणा जिल्हा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा. / From Wikipedia, the free encyclopedia
बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे. विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस (मध्य प्रदेशचा)नेमाड जिल्हा आहे.[1]
बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | अमरावती विभाग |
मुख्यालय | बुलढाणा |
तालुके | * खामगांव * चिखली * जळगाव जामोद * देउळगांव राजा * नांदुरा * बुलढाणा तालुका * मलकापूर * मेहकर * मोताळा * लोणार * शेगांव * संग्रामपूर * सिंदखेड राजा |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ९,६४० चौरस किमी (३,७२० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | २५,८८,०३९ (२०११) |
-लोकसंख्या घनता | २६८ प्रति चौरस किमी (६९० /चौ. मैल) |
-साक्षरता दर | ८५% |
-लिंग गुणोत्तर | १.०१ ♂/♀ |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ) |
-विधानसभा मतदारसंघ | मलकापूर, बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, सिंदखेडराजा |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ९४६ मिलीमीटर (३७.२ इंच) |
प्रमुख_शहरे | बुलडाणा, खामगाव, चिखली |
संकेतस्थळ |
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.
कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.