अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
स्वायत्त भारतीय सार्वजनिक वैद्यकीय संस्था गट / From Wikipedia, the free encyclopedia
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (All India Institutes of Medical Sciences ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस संक्षिप्त एम्स - AIIMS ) हा भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील उच्च शिक्षणाच्या स्वायत्त सार्वजनिक वैद्यकीय विद्यापीठांचा एक समूह आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्स दिल्ली नामांकीत रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या भारतात अनेक शाखा आहेत. १९५२ मध्ये एम्स रुग्णालयाचा संसदेत प्रस्ताव ठेवण्यात आला होता, १९५६ मध्ये त्यास मंजूरी मिळाली. एम्स रुग्णालये ही केंद्र शासनाच्या अखत्यारित येतात.[1] या संस्थांना संसदेच्या कायद्याने राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था म्हणून घोषित केले आहे. एम्स नवी दिल्ली ही अग्रदूत संस्था १९५६ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून आणखी २२ संस्थांची घोषणा करण्यात आली. जानेवारी २०२० पर्यंत, पंधरा संस्था कार्यरत आहेत आणि आणखी आठ संस्था २०२५ पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.