लात्व्हिया
From Wikipedia, the free encyclopedia
लात्व्हियाचे प्रजासत्ताक (लात्व्हियन: Latvijas Republika) हा उत्तर युरोपातील व बाल्टिक देशांपैकी एक देश आहे. लात्व्हियाच्या उत्तरेला एस्टोनिया, पूर्वेला रशिया, आग्नेयेला बेलारूस, दक्षिणेला लिथुएनिया हे देश तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. रिगा ही लात्व्हियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. लात्व्हियाला युरोपियन संघामधील सर्वात कमी लोकसंख्येच्या व सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक आहे. भूगोल, लोकजीवन, संस्कृती इत्यादींबाबतीत लात्व्हिया एस्टोनिया व लिथुएनिया ह्या इतर बाल्टिक देशांसोबत मिळताजुळता आहे.
लात्व्हिया Latvijas Republika लात्व्हियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
लात्व्हियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
रिगा | ||||
अधिकृत भाषा | लात्व्हियन | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
स्वातंत्र्य | रशियापासून | ||||
- घोषणा | १८ नोव्हेंबर १९१८ | ||||
- मान्यता | २६ जानेवारी १९२१ | ||||
- सोव्हिएत संघाचे अतिक्रमण | ५ ऑगस्ट १९४० | ||||
- नाझी जर्मनीचे अतिक्रमण | १० जुलै १९४१ | ||||
- सोव्हिएत संघाचा पुन्हा कब्जा | १९४४ | ||||
- स्वातंत्र्याची पुनर्घोषणा | ४ मे १९९० | ||||
- स्वातंत्र्य | २१ ऑगस्ट १९९१ | ||||
युरोपीय संघात प्रवेश | १ मे २००४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ६४,५८९ किमी२ (१२४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.५७ | ||||
लोकसंख्या | |||||
-एकूण | २२,१७,०५३ (१४३वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ३४.३/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३४.९२१ अब्ज[1] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १५,६६२ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८०५ (अति उच्च) (४३ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो भूतपूर्व: लात्व्हियन लॅट्स | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | LV | ||||
आंतरजाल प्रत्यय | .lv | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३७१ | ||||
ऐतिहासिक काळापासून अनेक साम्राज्यांचा भूभाग राहिलेल्या लात्व्हियाने पहिल्या महायुद्धानंतर १९१८ साली रशियन साम्राज्यापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. परंतु केवळ २२ वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर १९४० साली सोव्हिएत संघाने लष्करी आक्रमण करून हा भूभाग बळकावला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीची लात्व्हियावर सत्ता होती. महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाने पुन्हा येथे आपले अधिपत्य प्रस्थापित केले व लात्व्हियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची स्थापना केली. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर लात्व्हिया पुन्हा एकदा स्वतंत्र झाला.
स्वतंत्र झाल्यानंतर लात्व्हियाने बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आहे. सध्या लात्व्हिया एक प्रगत देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात ४३व्या क्रमांकावर आहे. २००८-२०१० दरम्यानच्या जागतिक मंदीदरम्यान प्रचंड अधोगती झाल्यानंतर २०११ साली लात्व्हियाची अर्थव्यवस्था युरोपियन संघामध्ये सर्वात वेगाने वाढली[2]. सध्या लात्व्हिया संयुक्त राष्ट्रे, नाटो, युरोपियन संघ, युरोपाची परिषद, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, डब्ल्यू.टी.ओ. इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.