प्रतिभा पाटील
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली होती. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
जलद तथ्य भारताच्या १२व्या राष्ट्रपती, पंतप्रधान ...
प्रतिभा पाटील | |
कार्यकाळ जुलै २५, २००७ – जुलै २४, २०१२[1] | |
पंतप्रधान | मनमोहन सिंग |
उपराष्ट्रपती | हमीद अन्सारी |
मागील | डॉ. अब्दुल कलाम |
पुढील | प्रणव मुखर्जी |
कार्यकाळ ८ नोव्हेंबर २००४ – २३ जुलै २००७ | |
मागील | मदनलाल खुराना |
पुढील | ए.आर. किडवाई |
जन्म | १९ डिसेंबर, १९३४ (1934-12-19) (वय: ८९) नाडगाव, तालुका-मुक्ताईनगर (तेव्हाचे-एदलाबाद). जि.जळगाव, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पती | देवीसिंह रणसिंह शेखावत |
धर्म | हिंदू राजपूत |
बंद करा
प्रतिभा पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.