इथियोपियन एरलाइन्स
From Wikipedia, the free encyclopedia
इथियोपियन एरलाइन्स (अम्हारिक: የኢትዮጵያ አየር መንገድ; የኢትዮጵያ) ही इथियोपिया देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. अदिस अबाबाजवळील अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यालय व प्रमुख तळ असलेली इथियोपियन एरलाइन्स १९४५ साली स्थापन करण्यात आली. इथियोपियन एरलाइन्स आफ्रिकेमधील सर्वात मोठ्या व सर्वोत्तम विमानकंपन्यांपैकी एक असून ती २०११ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. सध्या इथियोपियन एरलाइन्सद्वारे देशांतर्गत १९ शहरांना तर जगातील ६३ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवण्यात येते. भारतामधील दिल्ली, मुंबई व चेन्नई विमानतळांवर इथियोपियनची प्रवासी व मालवाहतूक सेवा कार्यरत आहे.
जलद तथ्य आय.ए.टी.ए. ET, आय.सी.ए.ओ. ETH ...
| ||||
स्थापना | २१ डिसेंबर १९४५ | |||
---|---|---|---|---|
हब | अदिस अबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
फ्रिक्वेंट फ्लायर | शेबामाइल्स | |||
अलायन्स | स्टार अलायन्स | |||
विमान संख्या | ७७ | |||
गंतव्यस्थाने |
१०१ (प्रवासी) २३ (माल) | |||
ब्रीदवाक्य | The New Spirit of Africa | |||
पालक कंपनी | इथियोपिया सरकार | |||
मुख्यालय | अदिस अबाबा, इथियोपिया | |||
संकेतस्थळ | http://ethiopianairlines.com/ |
बंद करा